परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो

परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो ;
फुलल्यावरती कमळालाही भवती गाटा* नको वाटतो.

अक्कलखाती किती टाकता नावे बाकी नुकसानीची
जुनी निघेना भरून हानी ,नवीन घाटा नको वाटतो.

स्थळ- काळाचे भान हरपते, केवळ उरतो आपण दोघे ;
टिकटिकणारा घड्याळातला तेव्हा काटा नको वाटतो

माझ्या हिस्स्यापुरती जागा मनात दुनिये दे कायमची ;
मला कुण्याही सिकंदराच्या धनात वाटा नको वाटतो.

वर्षामधुनी दोन - चारदा रस्ते झाडू, फोटो छापू ;
संत गाडगेबाबा तुमचा रोज खराटा नको वाटतो !

*चिखल
_______