किती धावतो दिवसाराती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
किती धावतो दिवसाराती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

किती धावतो दिवसाराती

किती धावतो दिवसाराती
थांब जरासा फुटेल छाती.
.
जीव घ्यायला टपले सगळे
सतरा लफडी,छप्पन नाती.
.
दगड मारतो ठोकर साधी
आयुष्याची होते माती.
.
पायामधला काटा काढा
बुके कशाला देता हाती?
.
नावापुरते नवरा -नवरी
लक्ष वेधती खास वराती.
.
वैश्विक झाला देव कधीचा
किडे मोजती अपुल्या जाती.

('शब्द शिवार'  दिवाळी 2017)