हासण्याची दे कला देवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हासण्याची दे कला देवा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हासण्याची दे कला देवा

हासण्याची दे कला देवा;
सोसणे झाले बला देवा.

दोष आहे का तिचा काही;
हाच नाहीना भला देवा!

मान माझी कापली त्याने;
वाटला जो आपला देवा.

रंग तोंडाचा नका पाहू;
भाव जाणा आतला देवा.

मोडले ना ज्यास दु:खाने
तो सुखाने वाकला देवा.

माणसांच्या सावलीने तू
काय होता बाटला देवा?