उभे चौकात वाटाडे नको त्यांच्याकडे जाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उभे चौकात वाटाडे नको त्यांच्याकडे जाऊ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

उभे चौकात वाटाडे, नको त्यांच्याकडे जाऊ

उभे चौकात वाटाडे, नको त्यांच्याकडे जाऊ;
पुढे गेल्यावरी वाटा निघाल्या सर्व टाकाऊ.

जसा तो बोलतो आहे तसा तो चालला नाही;
तुकारामास नव्हता रे कुणीही पाठचा भाऊ.


मिटेना भूक लाचेची हजाराने न लाखाने;
अता सांभाळ बाबा तू मुलांचा मोजका खाऊ.

हवा येथील देवांना बळी द्याया नवा बकरा;
उद्या आहे तुझी पाळी नको तू फार सोकावू.


तुला जर प्रेम आहे तर उरी कवटाळ जखमांना;
असा लांबून काडीने नको तू औषधी लावू.