७.९.२३

* चला फार मोठी प्रसिद्धी मिळाली

चला फार मोठी प्रसिद्धी मिळाली

हजारो जणांची उधारी बुडाली


कसा शेर सांगू तुझ्या आवडीचा

गझल पूर्ण माझी उतावीळ झाली


नसे काढलेला विमा जिंदगीचा

मुले-बायकोही उदासीन झाली


तुला फार झोंबेल माझी समीक्षा

अफू ही स्तुतीची तुझ्या भोवताली


अहंकार होता मला पुस्तकांचा

अखेरीस पोत्यात रद्दी निघाली.


म्हणे आणला मी पुडा मर्तिकाचा

तुझी त्यात सुद्धा असावी दलाली
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: