१८.१.२३

* पुन्हा या तनूला तुझा गंध आलापुन्हा या तनूला तुझा गंध आला

पुन्हा प्राण माझा सुगंधीत झाला


पुन्हा धुंद झाला नभी शुक्रतारा

तुझा कैफ आला पुन्हा चांदण्याला


तुझा श्वास झाला पुन्हा श्वास माझा

पुन्हा रोमरोमी तुझा स्पर्श झाला


तुझ्या कुंतलांनी पुन्हा कैद केले

उभा जन्म झाला पुन्हा  बंदिशाला


तुझे रूप ल्याली पुन्हा रात्र माझी

पुन्हा लोचनी या तुझी स्वप्नमाला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: