कोणावाचुन कोणाचे तीळमात्र अडले नाही
चेहरे असे ठेवावे जणु काही घडले नाही
हटकेबिटके नव्ह्त मी, तीही नव्हती अफलातुन
सुरळीत चालले सगळे काहीच बिघडले नाही.
शपथ घेऊन देवाची सांग खरे तू लेखनिका
अद्भूत पदरचे काही पोथीत घुसडले नाही
सत्तेसमोर चालेना भल्याभल्यांचे शहाणपण
बिळात घुसले पराक्रमी, कुणीच बडबडले नाही
पेपरातल्या फोटोची कदर लाडक्या बहिणींना
'भाऊ ' दिसला पानावर ते पान दुमडले नाही
गोड करावी भवतीची दुनिया नात्यागोत्यांची
जरी वागणे एखादे मुळीच आवडले नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा