२१.११.२१

काल जेव्हा तुझी भेट झालीकाल जेव्हा तुझी भेट झाली

रात्र तेव्हा दुपारीच आली


खूप होते पहारे तरीही

चंद्र आला नभातून खाली


ऊन टाकीत होते दुपारी

चांदण्याचा सडा भोवताली


मौन होते जरी ओठ तेव्हा

बोलणाऱ्या मुक्या हालचाली


काल पाऊस आला फुलांचा

प्रीत माझी सुगंधात न्हाली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: