१४.९.०९

शहराला मरणाची घाई


शहराला मरणाची घाई;
सवड काढ जगण्याला बाई

हृदयावरती टांगा पाटी:
रहदारीला सक्त मनाई.

असे वाटते तुझे भेटणे-
भिकारड्याला जशी मिठाई.

सर्व चेहरे एकसारखे;
गाय कोणती? कोण कसाई?

घाव खोल अन् जखमा ओल्या;
इतिहासाची हीच कमाई.

1 टिप्पणी:

Ganesh D म्हणाले...

Dear sir, I have been following your blog very closely. I liked this gazal, and mostly the first three shers, very much. It's a new one. I didn't find it in 'Gulaal.' How is everything else going?
Yours, Ganesh