Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

घराणे


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती?
तुझे चाहते कोण जाणे किती!

मला चार गोष्टी सदा सांगती;
तुझे दोन डोळे शहाणे किती.

मला नाव माझे स्मरेना प्रिये;
तुला पाठ झाले उखाणे किती!

किती जीवघेणा अबोला तुझा;
मला जाळण्याचे बहाणे किती!

गझल, गीत, कविता, रुबाई अशी-
तुझी राहण्याची ठिकाणे किती.

मला जात माझी विचारू नको;
तुझे उंच आहे घराणे किती.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP