मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालूनी विठू नेतात मंबाजी.


तुम्हाला हालता यावे, न साधे बोलता यावे;
पवित्रे टाकुनी ऐसे धरी पेचात मंबाजी.


कुमारी पाहिजे कन्या,तशी चालेल प्रौढाही;
असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी.


मला भंडावती येथे,तुलाही गांजती तेथे;
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी.


अहो ज्ञानेश्वरा, टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला;
फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी.


तुकारामा,अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.

------------------------------------------------------
('बोली' दिवाळी 1986)