Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

१२.९.०९

दिवस


आजकाल वाटती ना मला खरे दिवस;
यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.

देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;
थंड बैसला मुका काय हा करे दिवस?

बेगडी प्रकाश अन् बेगडीच सूर्य हा-
दाटल्या तमातला आज गुदमरे दिवस

पापण्यापल्याडची झेलता व्यथाफुले
लोचनात हास-या हळूच पाझरे दिवस.

वाटते पिकावरी टोळधाड यायची;
एरवी उगाच ना फार थरथरे दिवस.

रात्र उंदिरापरी काळजास कुरतडे
अन् सुळावरी जसा रोजचा सरे दिवस.

1 comments:

आशा जोगळेकर २ नोव्हेंबर, २००९ रोजी ४:४७ PM  

जळमटें मनातली काल झटकली बरें
आज मग कसा सुरेख गेला माझा दिवस ।
असेच वाटले तुमची गझल वाचून ।

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP