चाणाक्ष ह्या हवेचा श्वासात धाक ठेवा;
चालेल जीव गेला,शाबूत नाक ठेवा.
गर्भार दूर हेले, गोठ्यात वांझ गाई
चालेल दूध गेले,शाबूत ताक ठेवा.
कर्जात शेत गेले,व्याजात बैल गेले;
चालेल चाक गेले,शाबूत आख ठेवा.
पत्रात येत नाही आता जरी खुशाली;
चालेल टाचलेली,शाबूत डाक ठेवा.
येणार पीक बहिरे मातीत भामट्यांच्या;
चालेल पेरलेली,शाबूत हाक ठेवा.
पोटात माणसांनी काटे कसे भरावे?
चालेल चूल गेली,शाबूत राख ठेवा.
---------------------------------------
('अनुष्टुभ्' दिवाळी 1980)
---------------------------------------
('अनुष्टुभ्' दिवाळी 1980)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा