२१.३.०९

तसा न चंद्र राहिला

    तसा न चंद्र राहिला
संगीत : गायक : दिनेश अर्जुना



 तसा न चंद्र राहिला
संगीत : गायक : दिनेश अर्जुना



तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधूर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.
-------------------------------------------------
('तरुण भारत' 28 जुलै 1985)

■ लेखन : १ मार्च १९८४

२ टिप्पण्या:

Harish Dangat म्हणाले...

अतीशय अप्रतीम गझल आहे, शेवटचा शेर खोल वार करून जातो.

-हरीश दांगट

dr.shrikrishna raut म्हणाले...

आभार.