*पाहू नकोस माझ्या डोळ्यांत राजसा रे

पाहू नकोस माझ्या डोळ्यांत राजसा रे

जाशील तू बुडूनी डोहात राजसा रे


घरटे म्हणू कि याला मी देवघर म्हणावे

तू नांदतोस माझ्या हृदयात राजसा रे


चल स्वागतास जाऊ, वेचू फुले सुखाची

आला वसंत अपुल्या दारात राजसा रे 


सण साजरा करू रे हा रंगपंचमीचा

जे चार क्षण मिळाले हातात राजसा रे


सांगू कसे कळेना

जे वाटते जिवाला

ते मावणार नाही

शब्दांत राजसा रे


जातील दोन वाटा

आपापल्या दिशेने

उरणार रात्रवेडी

स्मरणात राजसा रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: