इगो - इगोचे भांडण आहे
फक्त एवढे कारण आहे
उखळ कुणाचे, मुसळ कुणाचे
सतत मनाचे कांडण आहे
दिसेल त्याला शिंग मारतो
तुटली त्याची वेसण आहे
जादू करती डोळे घारे
मोहक जारणमारण आहे
किती जिवांची झाली माती
काय तुझे हे धोरण आहे ?
गळते छप्पर, झरती डोळे
कसा जाळतो श्रावण आहे !
द्या कर्जाला माफी राजे
घाम आमचा तारण आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा