सोन्यास काय चाटू,खाऊ कसे हिर्याला?
श्रीमंत देव तुमचे लखलाभ ते तुम्हाला.
तू सांग थोर गोष्टी बाहेरच्या जगाला;
ठाऊक तू कसा रे आहे तुझ्या मनाला.
संसार मांडण्याच्या आधीच मोडला तू;
प्रेमात शेवटी तो व्यवहार आड आला.
पाण्यात पीठ बाळा मी घालते सुखाने;
तू गोड कर मुखाने समजून दूधकाला.
माझे मला न भारी लेंढार लेकरांचे;
का रुक्मिणी म्हणाली त्या बाप विठ्ठलाला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा