२४.१०.२१

मौनात अर्थ सारे,बोलू नकोस काही

मौनात अर्थ सारे,बोलू नकोस काही;

कविता मनातली ती शब्दात येत नाही.


“असतो कुठे तुझा रे मुक्काम रोज रात्री?”

वाऱ्यास प्रश्न वेडे पुसतात लोक काही.


सोसून घेत जा तू चारीकडून चटके;

तेव्हा फुटेल मित्रा  गझलेत छान लाही.


रुक्मास गूज सांगे कानात सत्यभामा

रात्री विठूस देते चोरून फूल राही.


सूर्यासमान देती उधळून जे स्वतःला,

त्यांची प्रकाशगाणी घुमती दिशात दाही.


(‘अनुष्टुभ’दिवाळी २०१२ वरून साभार)

..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: