बोलक्यांचा बोलबाला;
जो मुका तो ठार झाला.
काळजी घे काळजाची;
वीज आली भेटण्याला.
पाय चेपा सूर्यदेवा;
झोपते ही बारबाला.
फाटका बाहेर थांबा;
आतुनी आवाज आला.
तोच खुंटा,तीच दोरी;
तीच आहे बंदिशाला.
आत्मघाती धर्म बोले;
प्रेत उचला;स्फोट झाला.
(‘हंस’ दिवाळी २०११)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा