नर्सरीतली नात मागते पिझ्झा-बर्गर
जळे गॅसवर मनात माझ्या तेव्हा भाकर
.
लाव विठ्ठला हात जरासा ह्या जात्याला
जगणे दळता पीठ पडू दे शुभ्र निरंतर
.
नकोच गंगे टाकू तोंडी हिरवे पाणी
पापभीरुची अखेर व्हावी पवित्र घरघर
.
शिवून जखमा इलाज पक्का करा वैद्यहो
मलम लावणे सुरू कधीचे केवळ वरवर
.
कॅरी बॅगा खाउन दुभती गाय तळमळे
तू मुक्तीची सुरी एकदा फिरव गळ्या वर
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा