२२.११.१७

सभ्यतेचा वारसा मी घेत नाही

.
सभ्यतेचा वारसा मी घेत नाही
मी कुणाच्या फार नादी येत नाही
.
भोगतो मी एकट्याने भोग माझा
मी कुणावर दोष त्याचा देत नाही
.
जीव सांभाळून मारावा फवारा
जीव गेल्यावर पुन्हा तो येत नाही
.
कारणाने ह्या जुळेना लग्न त्याचे
त्यास नाही नोकरी की शेत नाही
.
हाव खाते माणसाला ही दुतोंडी
सांगते कोणी मढ्यावर नेत नाही.
.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: