२२.४.१७

तुझ्या डोळ्यात बसावं माझ्या जिवाला वाटते;
तिथं घरटं बांधावं माझ्या जिवाला वाटते.
.

तोंड लपवण्यासाठी मला नाही कुठे जागा;
तुझ्या मनात लपावं माझ्या जिवाला वाटते.
.

तुझ्या शिवाय जगणं वाटे जहराची पुडी;
तुझ्या सोबत मरावं माझ्या जिवाला वाटते.
.

माझ्या मनातलं गूज कसं मोठ्यानं मी बोलू;
तुझ्या कानात सांगावं माझ्या जिवाले वाटते.
.

माझ्या नावापुढे मला लावायचं तुझं नाव;
तुझं नाव मिरवावं माझ्या जिवाला वाटते.
.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: