२५.४.१७

कळला नाही शेर तुला तर चिंतन कर

कळला नाही शेर तुला तर चिंतन कर
आपट डोके पाषाणावर,चिंतन कर.

तुझी हलाखी, तुझ्या अडचणी,तुझे मरण
विसरशील तू सारे क्षणभर, चिंतन कर.

रोज आयत्या पिठावर ओढ रेघोट्या
बायको किती करते मरमर, चिंतन कर

तुझी विमाने, तुझ्या भराऱ्या चालू दे
काय चालले पण भूमीवर चिंतन कर.

कोण ठेवतो बंदुक खांद्यावरी तुझ्या
असा तुझा का होतो वापर,चिंतन कर

काय मनाचे मांडे भरती पोट कधी ?
बुडी लागले काय चुलीवर चिंतन कर.

मन मातीचे रसायनाने खारवले,
बाभळीस का लटके वावर ? चिंतन कर.

('कविता-रती' दिवाळी 2017)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: