Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२२.४.१७

केवळ टाळाटाळ सांगते,नंतर बोलू

केवळ टाळाटाळ सांगते,नंतर बोलू
आमंत्रण खास लबाडाचे,नंतर बोलू.
.
फक्त जराशी सुरसुर करून विझल्या वाती
फुसके सारे बार म्हणाले, नंतर बोलू.
.
सध्या नाही, आता नाही,थांब जरासा...
करून घे तू शंभर नखरे,नंतर बोलू
.
अजून गोळा झाली नाही हिम्मत मित्रा
एक आणखी पेग भरूदे, नंतर बोलू !
.
मुहूर्त शोधत पंचागाचे पान फाटले
सध्या साडेसाती आहे नंतर बोलू
.
नवीन आहे प्रेम आपले, स्तुती करू दे
चुका, उणीवा, दोष वगैरे नंतर बोलू.
.
गीता वाचुन काय फायदा गाढवांपुढे
आपण दोघे अती शहाणे नंतर बोलू.
.
बोलघेवडे,चिकणचोपडे बोल फोनवर
भेटीअंती निर्वाणीचे नंतर बोलू.
.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP