११.४.१७

मजेत होतो,मजेत आहे

मजेत होतो,मजेत आहे
मिठीत होतो,कवेत आहे.

शंभर टक्के खरे बोलतो
बडबडणारा नशेत आहे.

छुपा अजेंडा पडला उघडा
गोंधळ चालू सभेत आहे

सहज मारतो आवडलेले
निपुण चोरटा कलेत आहे

चाक भुईला टेकत नाही
महारथी तो हवेत आहे

आकाशातुन आग बरसते
शासन ए.सी. गुहेत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: