१९.२.१७

तू जगाला दे झकोला छानपैकी

■ तू जगाला दे झकोला छानपैकी
■ गझल : श्रीकृष्ण राऊत
■ स्थळ : पातूर : गोपाल गाडगे यांचे घर
■ दि. २३ नोव्हें.२३
■ VC: Pralhad Nilkhan



.
तू जगाला दे झकोला छानपैकी
मार त्याला मस्त टोला छानपैकी.
.
एक साधा मंत्र सांगू का सुखाचा
आण गजरा बायकोला छानपैकी.
.
घालतो प्रेमात बिब्बा फक्त पैसा
तेवढे सोडून बोला छानपैकी.
.
बंद झाली फ्लॅटची सारी कवाडे
काळजाचे दार खोला छानपैकी.
.
घोट दुःखाचा तसा पचणार नाही
तू घसा कर चिंब ओला छानपैकी.
.
होउद्या मधुमेह कडव्या कारल्याला
साखरेहुन गोड बोला छानपैकी.
.
जोतिबा या निर्मिकाचे सत्य सांगा
आसुडाने पाठ सोला छानपैकी.

( शब्द शिवार दिवाळी २२ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: