२६.२.१७

जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू

जिंकायाच्या कशा लढाया शिकून घे तू.
जखमांकडून गनिमी कावा शिकून घे तू.
.
आईच्या पोटात धड्यांचे पुस्तक नसते
अनुभवातून गिरवत कित्ता शिकून घे तू.
.
इमानदारी, हरामखोरी, दुनियादारी ;
पडेल कामी हरेक विद्या शिकून घे तू.
.
जीवन नसते देत कुणाला दुसरी संधी
सोने करण्याची ती किमया शिकून घे तू
.
कसे लागते जगण्यासाठी विष पचवावे
मला पहा अन् जरा शंकरा शिकून घे तू.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: