१०.१.१७

धीर धरावा सांगा कुठवर

धीर धरावा सांगा कुठवर
जीव आतला कापे थरथर

श्वास  घेइना फूल सुखाने
चार पाकळ्या झाल्या उपवर.

अभिनेत्यांचे हुकमी अश्रू
नकोस घेऊ कधी मनावर.

डोंगर अवघा आहे पोकळ
किती साजरा दिसतो वरवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: