Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

फाडून टाक नोटा

फाडून टाक नोटा,जाळून टाक नोटा ;
खातील त्या तुला रे,खाऊन टाक नोटा.
-
अपुले पिढ्यापिढ्यांचे पोटात पाप घेते ;
गंगेमधे वहात्या बुडवून टाक नोटा.
-
रांगेमधे उभे कर तू कामगार सतरा,
फेकून चार पैसे बदलून टाक नोटा.
-
मनिप्लॅन्ट पोसण्याला होईल खत सकस ते-
मातीत खोलवर तू गाडून टाक नोटा.
-
सोन्यात गुंतवा की डॉलर करा खरेदी ;
करतील तोंड काळे, लपवून टाक नोटा.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP