८.११.१६

मीच माझा खास शत्रू

मीच माझा खास शत्रू ,मीच माझा मित्र आहे ;
बाप दुःखाचा, कधी मी वेदनेचा पुत्र आहे.

एवढी भीती कशाची वाटते ह्या लेकरांना,
भूत नाही, प्रेत नाही,माणसाचे चित्र आहे .

तेच प्यादे, त्याच चाली, तीच सत्ता, तीच स्पर्धा...
सावजाला हेरणारा सापळा सर्वत्र आहे.

भोगताना भोग सारे मोकळा तू हास जीवा ;
दुःख हलके व्हावयाला हेच साधे सूत्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: