८.६.१६

घरावर आणती गोटे उघड झाल्यास घोटाळे

घरावर आणती गोटे उघड झाल्यास घोटाळे
कधी हे आम घोटाळे,कधी ते खास घोटाळे.

परीक्षा घेतली जेव्हा पुन्हा मेरीटवाल्यांची
निघाले कागदोपत्री किती नापास घोटाळे.

वजन अर्ध्यावरी आले, पुढे व्हावे कसे ह्यांचे?
कराया लागले म्हणती कडक उपवास घोटाळे.

हवा मारून पंपाने फुगा रंगीत फुगवावा
उभा करती खुशालीचा तसा आभास घोटाळे.

कधी आनंद नासवती, कधी प्रेमास बाटवती ;
कधी घेतात रयतेच्या सुखाचा घास घोटाळे.

शिळे झालेत केव्हाचे नको पारायणे त्यांची
घडवती रोजचा वाचा नवा इतिहास घोटाळे.

( 'कविता - रती ' दिवाळी २०१६ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: