Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

१८.६.१५

जातीत वाटलेला,धर्मात वाटलेला

जातीत वाटलेला,धर्मात वाटलेला;
सोयीनुसार मानव भेदात वाटलेला.

त्याला मनाप्रमाणे जगता कधी न आले;
प्रत्येक श्वास त्याचा नात्यात वाटलेला.

उकरून दोष माझे करती रवंथ शत्रू;
माझा भलेपणा मी मित्रात वाटलेला.

बाबास ठेव येथे,आई तुझ्याकडे ने;
वृद्धापकाळ त्यांचा पोरात वाटलेला.

फुकटात मार्गदर्शन  देऊन तज्ज्ञ गेले;
झाडून मार्ग काढा काट्यात वाटलेला.

नेत्यास द्या कलेजी,बाकी शिकार तुमची;
हिस्से करून बकरा चोरात वाटलेला!

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP