१७.५.१५

घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी

घ्यावी मना नव्याने तू एकदा उभारी;
तेव्हा फिटेल मित्रा,दुःखातली उधारी.

माझ्या चिल्यापिल्यांचा हिसकून घास नेतो;
समजाव पावसाला,माझी चुकेल वारी.

बापास बाप ना तू,आईस माय म्हणतो;
शिणलास व्यर्थ पुत्रा,हिंडून धाम चारी.

कर दूर गौतमा तू शंका यशोधरेची-
नव्हते घरात का ते,जे शोधलेस दारी?
                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: