Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

सोडेन बायकोला जर ऐकणार नाही

सोडेन बायकोला जर ऐकणार नाही;
पण देश सोडण्याचा माझा विचार नाही.

चालेल ना मिळाल्या शेरास खूप टाळ्या;
मी कल्पना कुणाची पण चोरणार नाही.

बांधून हात माझे घेतोस तू परीक्षा
देऊ कशी हमी मी लाथाडणार नाही.

याहून वेगळी का असणार देशसेवा;
फाईल कोणतीही मी दाबणार नाही.

थकलीत औषधे अन् शिणलेत वैद्य सारे
वेडेपणात त्याच्या काही उतार नाही.

फुटणार घाम नाही दगडास यंत्रणेच्या;
तितका प्रभावशाली तुमचा प्रहार नाही.

तो देव एक सच्चा बाकी दुकानदारी;
होताच स्पर्श स्त्रीचा जो बाटणार नाही.

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP