२६.११.१४

सन्मानाचे गाणे गाऊ

सन्मानाचे गाणे गाऊ;
अपमानाने नाचत राहू!

किती आवळुन बांधा मुसके;
पिके कोवळी चोरुन खाऊ.

नकोस गंगे अश्रू ढाळू;
शाॅवरखाली सचैल न्हाऊ!

सहन होइना...न ये सांगता;
अवघड जागी जैसा बाऊ!

इतकी चिन्हे उद्गाराची!
असेल बहुधा कवी शिकाऊ.

तुझी तस्करी,माझा डाका;
सुखात राहू दोघे भाऊ!

मिळेल समता भाड्याने अन्
इथे ठेवला न्याय विकाऊ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: