Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

काय होईल? कसं होईल?

काय होईल? कसं होईल?
जसं होईल...तसं होईल!

नको वेगळी करू अपेक्षा;
चालत आलं...तसं होईल.

देवालाही नसे कल्पना:
अखेर त्याचं 'असं' होईल!

उचला पाउल...टाका पुढती;
सोडा चिंता...कसं होईल?

ज्याची असते जबान काळी;
तो जे म्हणतो... तसं होईल!

फास लावुनी 'सुटला' तू पण
...उरलेल्यांचं कसं होईल?

हात टाकले गहाण का तू?
सांग अशानं कसं होईल?


  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP