१६.१०.१४

दिवसा टीका करीत राहू

दिवसा टीका करीत राहू;
रात्री सोबत...'घेऊ'...जेऊ!

शिकले पक्षी दुनियादारी :
दाणे टाका...गाणे गाऊ!

रस्ते, सिंचन, फ्लॅट, कोळसा...
पिढ्या सातशे बसून खाऊ!

एक आंधळा,दुसरा फुटका;
दावा करती : भविष्य पाहू!

सहन होइना...न ये सांगता;
अवघड जागी जैसा बाऊ!

खरे खरे तू बोल विठ्ठला,
कोण कुणाचा 'मोठ्ठा' भाऊ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: