८.२.१५

माझ्या समोर येऊ तर द्या

माझ्या समोर येऊ तर द्या;
डोळेभरून पाहू तर द्या!

उद्या चुलीच्या गुलाम कायम;
आज मुलींना खेळू तर द्या.

रस्त्यावरती येइल बाबू;
चार ठोकरा खाऊ तर द्या!

तुमची स्वप्ने नंतर लादा;
आधी त्याला जेवू तर द्या!

पृथ्वीवाणी सोशिक होण्या;
माती चुंबुन घेऊ तर द्या!

हिस्से-वाटी,भांडा-भांडी;
प्रेत उचलून नेऊ तर द्या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: