२४.७.१४

तलवारिचा कसाही चुकवेल वार तो

तलवारिचा कसाही चुकवेल वार तो;
खोट्या तुझ्या स्तुतीने होईल ठार तो!

त्या ऊन-पावसाच्या गप्पा जरी सुरू
काढेल शेवटी पण तुमचा पगार तो.

दररोज अन्न वाया जाते बुफेत का?
नाही भुकेस माझ्या रुचला प्रकार तो!

केसास रंग काळा देतो मिशी सवे;
साठीतला बुढाऊ भासे कुमार तो!

टाळ्यात गाजताना अभिजात वाटला;
काळा,तुझ्या पुढे पण ठरला टुकार तो!

तू बाप आमचा की आम्ही तुझे पिता?
ऐकून प्रश्न माझा,झाला फरार 'तो'!

('मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: