२४.७.१४

भक्तांच्या हातात बाहुला विठ्ठल


भक्तांच्या हातात बाहुला विठ्ठल;
नाच म्हणू तैसे नाचला विठ्ठल.

जत्रेमध्ये तिचा देह धन्य झाला;
गो-या हातावर गोंदला विठ्ठल.

टोळांचा सांगाती;भैरवांचा मित्र;
टोळीयुद्धातून भांडला विठ्ठल.

रात्रभर त्याने केली वादावादी;
सकाळी सकाळी घोरला विठ्ठल.

भक्तिभाव ऐसा भोगुनी कावला;
आरतीला नाही पावला विठ्ठल.

मंदिरात नाही,नाही हृदयात;
अज्ञातवासात धाडला विठ्ठल!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: