लाभो अम्हा तुकोबा शेजार निंदकांचे;
दारापुढे असावे ते दार निंदकांचे.
किरकोळ-थोर कोणी,आहे लहान-मोठा;
देवा,किती घडवले आकार निंदकांचे!
टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले;
मानू हजार वेळा आभार निंदकांचे.
मिळतात ठोक येथे साबण त-हेत-हेचे;
दुनियेस स्वच्छ करती बाजार निंदकांचे.
ज्ञानेश्वरास छळती,पिळतात जे तुक्याला;
पाहून घ्या विठोबा अवतार निंदकांचे!
स्वर्गात थेट नेते त्यांची विमानसेवा;
झाले अनंत कोटी उपकार निंदकांचे!
('मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)
दारापुढे असावे ते दार निंदकांचे.
किरकोळ-थोर कोणी,आहे लहान-मोठा;
देवा,किती घडवले आकार निंदकांचे!
टीका करून त्यांनी आम्हास शुद्ध केले;
मानू हजार वेळा आभार निंदकांचे.
मिळतात ठोक येथे साबण त-हेत-हेचे;
दुनियेस स्वच्छ करती बाजार निंदकांचे.
ज्ञानेश्वरास छळती,पिळतात जे तुक्याला;
पाहून घ्या विठोबा अवतार निंदकांचे!
स्वर्गात थेट नेते त्यांची विमानसेवा;
झाले अनंत कोटी उपकार निंदकांचे!
('मीडिया वाॅच' दिवाळी २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा