२७.७.१४

आसवांनी भिजून घ्या

आसवांनी भिजून घ्या;
काय लागे अजून घ्या़.

स्वप्न देतो नवीन मी;
लोचनांनो निजून घ्या़.

साज सध्या महागला;
लक्तरांनी सजून घ्या़!

ही गटारे खुली तुम्हा;
लागले तर कुजून घ्या़

तोंड काळे करून या;
भाकरी मग भुजून घ्या़

देव आले त्वरा करा
खेटरांनी पुजून घ्या!

('दारव्हा टाइम्स' दिवाळी 1983)
■ लेखन : २६ मार्च १९८१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: