२४.७.१४

सिंहासमान आम्ही टाकू जरी पवित्रे


सिंहासमान आम्ही टाकू जरी पवित्रे;
हाडूक चोरणारे आम्ही मुळात कुत्रे!

मेलास की जिता तू कळते दुरून त्यांना;
मॅसेज-बाॅक्स आला घेऊन प्रेमपत्रे.

तोंडे शिवून भिंती फिरवून पाठ बसल्या
अन् बोलक्या घरांची झाली अबोल चित्रे!

उरल्या कशा कळेना ह्या वादळात टोप्या,
जर मोडक्या घरांची गेली उडून पत्रे.

युक्त्या करून आम्ही पाठीत बाण मारू;
आम्हा पराक्रम्यांना म्हणती उगीच भित्रे!

मागू नकोस भिक्षा;होईल सक्त शिक्षा;
आहेत छावण्या ह्या,नाहीत अन्नसत्रे!

10-10 -80




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: