दुनियेस तू कशाला करतो दुरुस्त मित्रा;
घे काळजी स्वतःची वैफल्यग्रस्त मित्रा.
दिवसा इथे उजेडी होतात रोज चो-या;
तू घालतोस वेड्या रात्रीस गस्त मित्रा.
ते यार-दोस्त सगळे का टाळती तुला रे;
अन् बायको-मुलेही झालीत त्रस्त मित्रा.
माझ्या कलंदरीचा करती फकीर हेवा;
मस्तीत राहतो मी आजन्म मस्त मित्रा!
कॅलेंडरास त्याने जाळून टाकले पण
टळणार काय आहे सूर्यास अस्त मित्रा!
घे काळजी स्वतःची वैफल्यग्रस्त मित्रा.
दिवसा इथे उजेडी होतात रोज चो-या;
तू घालतोस वेड्या रात्रीस गस्त मित्रा.
ते यार-दोस्त सगळे का टाळती तुला रे;
अन् बायको-मुलेही झालीत त्रस्त मित्रा.
माझ्या कलंदरीचा करती फकीर हेवा;
मस्तीत राहतो मी आजन्म मस्त मित्रा!
कॅलेंडरास त्याने जाळून टाकले पण
टळणार काय आहे सूर्यास अस्त मित्रा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा