तुझ्या रक्तात ओलावा कधी रे आटला मित्रा?
तुझ्या हाडात वाळूने पसारा थाटला मित्रा!
जिभेला फोड आलेले,फुटेना शब्द प्रेमाचा;
विषारी आवळ्यांचा तू मुरब्बा चाटला मित्रा!
तुझी ही अंगकांती की कट्यारी तेज धारीच्या;
तुझ्या एकाच स्पर्शाने फुलोरा छाटला मित्रा.
तुझे हे कान गोट्याचे तुला ऐकू कसे यावे?
किती देऊ तुला हाका घसाही फाटला मित्रा.
तुझ्या श्वासातुनी आता गळाया लागली माती;
उभे खिंडार भिंतीचे तसा तू वाटला मित्रा.
पुन्हा ठेवू नको येथे तुझे हे पाय घाणीचे;
फुलांचा देश त्याने हा कधीचा बाटला मित्रा.
('दृष्टी' दिवाळी 1984)
■ लेखन : २५ मार्च १९८१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा