सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;
हा बहर यौवनाचा देहास फार झाला़
आला असा पुᆬलोरा गेली झुकून फांदी;
पदरातही लपेना इतका उभार झाला़
गालावरी कळयांना उमलून रूप आले;
हा ताटवा गुलाबी वाटे तयार झाला़
अंगांग गौरकांती नाजूक मी चमेली;
शृंगारल्या उन्हाने मजला विकार झाला़
नाचे नसात ताजी ही धून लावणीची;
झंकार स्पंदनांचा तर बेसुमार झाला़
ओठात लाज आहे बोलू कसे मनाचे;
नाही कसे म्हणू मी खोटा नकार झाला़
चुकवू किती सरींचा वर्षाव हा सुगंधी;
आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला़!
('तरुण भारत' 18 मार्च 1979)
हा बहर यौवनाचा देहास फार झाला़
आला असा पुᆬलोरा गेली झुकून फांदी;
पदरातही लपेना इतका उभार झाला़
गालावरी कळयांना उमलून रूप आले;
हा ताटवा गुलाबी वाटे तयार झाला़
अंगांग गौरकांती नाजूक मी चमेली;
शृंगारल्या उन्हाने मजला विकार झाला़
नाचे नसात ताजी ही धून लावणीची;
झंकार स्पंदनांचा तर बेसुमार झाला़
ओठात लाज आहे बोलू कसे मनाचे;
नाही कसे म्हणू मी खोटा नकार झाला़
चुकवू किती सरींचा वर्षाव हा सुगंधी;
आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला़!
('तरुण भारत' 18 मार्च 1979)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा