लाजली पौर्णिमा
गायक : पद्मश्री सुरेश वाडकर
संगीत : गझल गंधर्व सुधाकर कदम
लाजली पौर्णिमा
संगीत : गायक : गझल गंधर्व सुधाकर कदम
लाजली पौर्णिमा : सुधाकर कदम
लाजली पौर्णिमा, लोपला चंद्रमा;चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला़
सांगतो मी खरे, फार झाले बरे;फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला़.
जीवघेणी तुझ्या पाहण्याची तर्हा,खोल गेला उरी पापणीचा सुरा;
प्राण तू घेतला, स्वर्ग त्यांना दिला;काल ज्यांनी तुझा चेहरा पाहिला़.
रंग आहे तुझा हा बिलोरी असा,आरशांचा गडे तूच गं आरसा;
अंग शृंगारण्या, रूप न्याहाळण्या;आरशांनी तुझा चेहरा पाहिला़!
टंच ओठी तुझ्या हे मधाचे झरे;श्वास होण्या तुझा रोज वारा झुरे;
गर्व त्या हारल्या, सर्व त्या भाळल्या;अप्सरांनी तुझा चेहरा पाहिला!
देखणे खूप हे रूप आहे असे,पाहता पाहता देव तोही फसे;
मत्सराने अता पेटल्या देवता;काय त्यांनी तुझा चेहरा पाहिला?
('तरुण भारत' 18 डिसेंबर 1983)
■ लेखन : १ नोव्हेंबर १९८३

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा