२७.७.१४

कशी वेळ आली

कशी वेळ आली;
क्षमा क्रूर झाली!

हसे आज कुंकू
गमावून लाली़.

करा बंद वर्षा;
पिके तर जळाली़.

बगीच्यात प्रेते
फुलांची मिळाली़.

बघा ही गटारे;
सुगंधात न्हाली़!

खुनी देव झाले;
पुजारी मवाली!

('कविता-रती' जाने- फेब्रु. १९८६ )

■ लेखन : २३ ऑक्टोबर १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: