जी जाळते मला ती माझीच आग आहे;
आता कवेत घेणे कवितेस भाग आहे.
स्पर्शू नका फुलांना होईल सक्त मजुरी;
जन्मांध कायद्यांची राखीव बाग आहे.
जो ऐकताच झाले कित्येक लोक बहिरे;
गाण्यात कोणता हा भेसूर राग आहे?
होता जहाल मागे केव्हा तरी विषारी;
तो दंतहीन सध्या पाळीव नाग आहे.
समजून झोपलेला कापू नको गळा तू;
घालून तेल माझ्या डोळ्यात जाग आहे.
घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा
स्वस्तात रक्त मिळते भाकर महाग आहे!
लेवून शुभ्र वस्त्रे झाकून घे कितीही;
केव्हा तरी तुझा तो दिसणार डाग आहे.
('दिशा' 1986)
■ लेखन : २० जून १९८३
आता कवेत घेणे कवितेस भाग आहे.
स्पर्शू नका फुलांना होईल सक्त मजुरी;
जन्मांध कायद्यांची राखीव बाग आहे.
जो ऐकताच झाले कित्येक लोक बहिरे;
गाण्यात कोणता हा भेसूर राग आहे?
होता जहाल मागे केव्हा तरी विषारी;
तो दंतहीन सध्या पाळीव नाग आहे.
समजून झोपलेला कापू नको गळा तू;
घालून तेल माझ्या डोळ्यात जाग आहे.
घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा
स्वस्तात रक्त मिळते भाकर महाग आहे!
लेवून शुभ्र वस्त्रे झाकून घे कितीही;
केव्हा तरी तुझा तो दिसणार डाग आहे.
('दिशा' 1986)
■ लेखन : २० जून १९८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा