१९.५.१०

हासतो जरी स्वरात मी

हासतो जरी स्वरात मी;
घाव झाकतो उरात मी.

माणसात पाहतो तुला;
शोधतो न मंदिरात मी.

आग चुंबितो क्षणोक्षणी -
आज कोणत्या भरात मी.

हा उगा प्रकाश ना पडे;
चेतलोय अंतरात मी.

दु:ख सोबती असे मला;

एकटा न ह्या घरात मी.
---------------------------------
('तरुण भारत' 8 मे 1983)

■ लेखन : २९ मार्च १९८३
_____________________

1 टिप्पणी:

Milind Hiwarale म्हणाले...

priy sir, aapli mazi gazal marathi vachli. aavdli. abhinandan. shubhechchha...